spot_img
spot_img
spot_img

पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी एकजुटीने काम करा – आमदार महेश लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने आणि एकजुटीने काम करावे. संघटनात्मक समन्वय मजबूत करत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. बैठकीला सर्व नगरसेवक, मंडल अध्यक्ष, प्रभारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते. यावेळी निवडणुकीची पूर्वतयारी, प्रचार यंत्रणेचे नियोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक समन्वयाचा आढावा घेण्यात आला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्यासाठी संपर्क अभियानाला गती देण्याचे आवाहन लांडगे यांनी केले. प्रत्येक मंडलातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांचे नियोजन करून मतदारांशी थेट संवाद साधावा, यावर त्यांनी भर दिला.

मतदार संपर्काचे काम प्रभावी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवारांची माहिती आणि पक्षाची भूमिका पोहोचवताना संपर्कातील कोणतीही उणीव राहणार नाही, याची काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्रिय करून प्रचाराला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

२३ ऑक्टोबर रोजी मतदान
दिलेल्या माहितीनुसार, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. पात्र मतदारांनी मतदानात सहभाग घेऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याला प्राधान्य द्यावे. प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीतील आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडल्यास संघटनेची ताकद मतदानातून दिसून येईल, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार पुण्यासह पाचही जागांवर विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकर्त्यांची ऊर्जा, संघटनेची बांधिलकी आणि विजयाचा संकल्प यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

“संघटनात्मक एकजूट हीच भाजपाची ताकद आहे. प्रत्येक मंडलाने जबाबदाऱ्यांचे स्पष्ट नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौत्सुभ मुरलीधर गावडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संघटित प्रयत्नांच्या बळावर विजयाचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!