शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री आणि पद्मभूषण दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनाही दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, महाराष्ट्र प्रदेश प्रधान सचिव प्रा. डॉ. अशोक गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद शेलार आणि हरिभाऊ वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन लोक जनशक्ती पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आयु. सुंदर कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमाला पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्ष आदिती क्षेत्री, ममता पवार, प्रभाग क्रमांक २१ च्या महिला अध्यक्ष सायरा बानो शेख, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष समीना शेख, महिला उपाध्यक्ष, भोसरीचे राजाभाऊ धिमधिमे, वाहतूक आघाडीचे नसीम शेख, पिंपरी-चिंचवड शहर संघटक आनंद भाकरे, युवक संघटक आकाश काळे, प्रकाश दाभाडे, तानाजी पवार, मारुती काळे आणि बालाजीनगर येथील प्रसाद गायसमुद्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष वृषाली कदम यांनी केले, तर शहर उपाध्यक्ष अमित कुमार आर्या यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रामविलास पासवान यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्याचा आणि आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.




Total Users : 229688