spot_img
spot_img
spot_img

चिखलीत घराबाहेर बोलण्यावरून वाद; तरुणावर चाकूने हल्ला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

घरासमोर राहण्याच्या कारणावरून बोलण्याचा राग मनात धरून एका तरुणाने फिर्यादीला शिवीगाळ करत चाकूने पोटात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दत्तनगर, चिखली परिसरात घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अंकुश पोपट नलावडे, वय ३५ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. दत्तनगर, मकडमळा, चिंचवड, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अविनाश पोपट नलावडे, रा. दत्तनगर, मकडमळा, चिंचवड हा आरोपी आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि साक्षीदार पूजा नलावडे हे आरोपीसमोर असताना आरोपीच्या मुलांबाबत बोलण्यात आले. त्यांची मुले झोपडपट्टीत राहत असून बिघडत असल्याने त्यांना बाहेर राहण्यास सांगितल्याचा राग आरोपीला आला.

याच कारणावरून आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदाराला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी घरासमोरील रस्त्यावर उभा असताना आरोपीने घरातील किचनमधून चाकू आणून फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 352 तसेच भादंवि कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!