spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून साडेचार लाखांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण येथील सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून ते गहाण ठेवत तब्बल ४ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विकासनाथ भारते, वय ४५ वर्षे, व्यवसाय सिद्धनाथ ज्वेलर्स, रा. फ्लॅट क्रमांक बी-२०५, ग्रीन सिटी, रोहकळ रोड, चाकण, मूळ रा. भुतांडा खानापूर, जि. सांगली यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित पांडू गदळे, वय २२ वर्षे, रा. कुबेर पार्क, वडगाव रोड, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. न्हावीफळ, ता. केज, जि. बीड आणि समीर सुरेश माने, वय ३३ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. आनंद टॉवर, बिल्डिंग क्रमांक २४, प्लॉट क्रमांक १४०३, उलवे, नवी मुंबई, मूळ रा. राष्ट्रात्मा चौक, शेजारी, वडूज, जि. सातारा यांनी बनावट सोन्याचे दागिने तयार करून ते खरे असल्याचे भासविले.

आरोपींनी फिर्यादीच्या सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये ५२.२७० ग्रॅम वजनाच्या तीन चैन गहाण ठेवून फिर्यादीची फसवणूक केली. त्यानंतर त्याबदल्यात फिर्यादीकडून ४ लाख ४४ हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढे आरोपींनी त्याच बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून त्यांची विक्री करून रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 62, 3(5) तसेच भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!