spot_img
spot_img
spot_img

माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महामेळावा

३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट; १४ जिल्ह्यांतून ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार

पिंपरी, दि. २७ : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधून ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे , जयदीप खापरे , इम्रान पानसरे यांच्या सह कामगार युनियन चे पदाधिकारी उपास्थीत होते

मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री रविंद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. माथाडी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कामगारांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळातील कार्यक्रमांवरही विचारविनिमय केला जाणार आहे.

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट
संघटनेच्या विस्तारासाठी २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन आणि उपाययोजनांवर मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे अनुप मोरे यांनी सांगितले.

बेरोजगारांसाठी ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ’

मेळाव्याच्या निमित्ताने बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना ऑन-द-स्पॉट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पाचवीपासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी देण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्यात सहभागी होऊनही तत्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महाराष्ट्रातील माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र मंडळांची व्यवस्था असल्याची माहिती राज्याच्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!