शबनम न्यूज | प्रतिनिधी
एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नेक्स्टजेन टेक्निकल कॅम्पस येथे बीई व एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘आरंभ’ या प्रेरणादायी प्रवेश कार्यक्रमाचे आज उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत तसेच एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्येच्या देवतेचे आशीर्वाद घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सकारात्मक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या ग्रुप डायरेक्टर तथा नेक्स्टजेन टेक्निकल कॅम्पसच्या प्राचार्या डॉ. मनीमाला पुरी यांनी स्वागतपर भाषण करत उपस्थित मान्यवर व नवागत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले. यानंतर डॉ. संदीप पाचपांडे यांनी एएसएम समूहाच्या ४२ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. आगामी चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकाग्रता, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रगतीची वृत्ती अंगीकारावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
प्रमुख पाहुणे श्री. विवेक सावंत यांनी बीजभाषणात विद्यार्थ्यांना आजीवन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात भविष्यकालीन कौशल्ये आत्मसात करत जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, चॅटजीपीत येण्यापूर्वीचा काळ (BC – Before ChatGPT) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अभूतपूर्व प्रलयाचा काळ (AD – After AI Disruption) यांमधील बदल स्पष्ट करत, विद्यार्थ्यांनी या एआय (AI) तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत सुज्ञपणे व योग्य दिशेने करण्याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वरिष्ठ मान्यवरांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत समूहाच्या शैक्षणिक अनुभवाची माहिती दिली व भविष्यातील संधींचे स्पष्ट चित्र उलगडले. यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता –
– डॉ. एस. बी. माथूर, महासंचालक, एएसएम इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अँड रिसर्च
– डॉ. दत्तात्रय बाळसराफ, टास्क फोर्स समिती सदस्य व व्यवस्थापकीय संचालक, – एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
– डॉ. ललित कानोरे, प्राचार्य, एएसएम सीएसआयटी
– श्री. जमीर मुल्ला, सीएमओ, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
– श्री. अमिन खान, जनसंपर्क अधिकारी, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
समूहातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाकडे केवळ एक टप्पा म्हणून न पाहता, भविष्याचा भक्कम पाया म्हणून पाहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून पहिल्याच दिवसापासून स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचा, सतत जिज्ञासू वृत्तीने नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा, शिस्त व सातत्य अंगीकारून सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचा, तसेच शैक्षणिक सुविधांसह मार्गदर्शक व उद्योग क्षेत्राशी संपर्क साधत संपूर्ण कॅम्पस परिसंस्थेचा पुरेपूर लाभ घेण्याचा सल्ला दिला. आव्हानांना संधीत आणि अपयशाला धड्यात रूपांतरित करण्याचा मूलमंत्रही त्यांनी यावेळी दिला.
पुढील चार वर्षे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी असून, ध्येयाने प्रेरित होऊन निर्धारपूर्वक वाटचाल करणाऱ्यांनाच यश मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला. एएसएम समूह गेल्या ४२ वर्षांपासून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत असून, संपूर्ण एएसएम कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रेणू पराशर, विभाग प्रमुख (प्रथम वर्ष अभियांत्रिकी) यांनी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल आभार मानले तसेच नवागत विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केले. डॉ. प्रशांत पाटील (कुलसचिव), डॉ. धनंजय उपासनी (शैक्षणिक अधिष्ठाता) आणि डॉ. केतन देसले (आयक्यूएसी अधिष्ठाता तथा एएसएम समूहाचे डिजिटल स्ट्रॅटेजी प्रमुख) तसेच एएसएम्स नेक्स्टजेन टेक्निकल कॅम्पसच्या संपूर्ण स्टाफच्या देखरेखीखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले. “आरंभ करा. नवोन्मेष घडवा. भविष्य घडवा!” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता झाली




Total Users : 224929