शबनम न्यूज | प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला सिमेंटच्या गट्टूने डोक्यात आणि तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना संत तुकारामनगर परिसरातील नेहरूनगर येथे घडली. याप्रकरणी जालिंदर विष्णू हाडवळे (वय ३१, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्याविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नेहरूनगर येथील इमारत क्रमांक ४ आणि ६ मधील पार्किंगमध्ये ही घटना घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने तक्रारदार तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर सिमेंटचा गट्टू मारला. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जखमी केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.




Total Users : 224829