spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये जुन्या वादातून रस्त्यावर राडा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान रस्त्यावरील हाणामारीत झाल्याची घटना चिंचवड येथील स्पाईन रोड परिसरात घडली. रेल विहार सोसायटीजवळ सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून परस्परांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल रामदास जगताप यांनी फिर्याद दिली आहे. अरविंद वाघमोडे (वय २३), वंश चट्टे (वय २४), प्रेम वाघमोडे (वय २०), आकाश नाळे (वय ३०), विजय डोंगरे (वय २४) आणि रोहित मस्के (वय २१) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पाईन रोडवरील रेल विहार सोसायटीजवळ हा प्रकार घडला. जुन्या वादातून संबंधित तरुण एकत्र आले. त्यानंतर पुन्हा वाद उफाळल्याने त्यांनी एकमेकांची गचांडी पकडून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!