spot_img
spot_img
spot_img

व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल स्पर्धा अंतिम निकाल

पुणे फेस्टिवल अंतर्गत दरवर्षी सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले जाते. या सुगम संगीत स्पर्धेचे यंदाचे 16 वे वर्ष आहे. त्याचप्रमाणे गेले तीन वर्ष अंतर महाविद्यालयांना स्पर्धा घेतल्या जात असून त्यामध्ये विजेत्या कॉलेजला करंडक दिला जातो हा करंडक फिरता करंडक असतो.

दिनांक 20 सप्टेंबर रोजी बालगंधर्व येथे या स्पर्धेची अंतिम फेरी ठेवण्यात आली. एकूण बारा कॉलेजेस व खुल्या गटात 159 स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला. त्यापैकी 30 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली व यातील स्पर्धकातून एकूण बारा स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. 40 वयोगटाच्या खालील महिला व पुरुष यामध्ये प्रथम क्रमांक यंदा पहिल्यांदाच नाशिक येथील वैष्णवी पगारे हिने जिंकला असून द्वितीय क्रमांक‌ अमेय तरणीकर यांनी पटकावला. 40 वयोगटाच्या पुढील महिला व पुरुष यामध्ये प्रथम क्रमांक संजय लागू व द्वितीय क्रमांक चित्रा पेंढारकर यांनी पटकावला.
विद्यार्थ्यांमध्ये एकूण सहा विद्यार्थ्यांची अंतिम फेरीरीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक एमआयटी कॉलेजचा ओम पत्की याने तर द्वितीय क्रमांक प्रतिभा कॉलेज चिंचवडच्या आसावरी गुडादे यांनी पटकावला.

यंदाच्या वर्षीचा अंतिम फेरीसाठी एमआयटी कॉलेज लोणी, डी वाय पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स आर्ट्स अँड सायन्स, पिंपरी व झील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या तीन महाविद्यालयांची निवड झाली व पुणे फेस्टिवल फिरता करंडक यंदाच्या वर्षीही एमआयटी कॉलेज लोणी यांनी पटकावला. एमआयटी कॉलेजचे यंदाचे विजेते मानकरी होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिरीष सरदेशपांडे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अँटिक करप्शन ब्युरो यांनी उपस्थिती लावली व त्यांच्या हस्ते बक्षीस वाटण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची बक्षिसे वाटण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रथम फेरी व अंतिम फेरीस परीक्षक म्हणून ज्येष्ठ तबला वादक श्री मोहन पारसनीस व तसेच ज्येष्ठ व‌ नामवंत गायिका डॉक्टर मोनिका दामले व देविका दामले यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या समन्वयक एडवोकेट अनुराधा भारती होत्या. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे विश्वस्त मोहन टिल्लू, अतुल गोंजारी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!