३८व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा पुण्यातील भवानी पेठ येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियमवर रविवार दि. २० सप्टेंबर रोजी रंगल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या या स्पर्धेत १८ वर्षांखालील विविध ८ वजनगटात ६० मूली आणि ८० मुले खेळाडू सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक स्पर्धेचे मुख्य संयोजक व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोज भोरे व क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले हे उपस्थित होते. या प्रसंगी पुणे बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, विजय गुजर, सुरेश गायकवाड आणि अशोक मेमजादे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले.




Total Users : 224170