spot_img
spot_img
spot_img

उन्नतीच्या मानाच्या गणपतीची पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांच्या हस्ते आरती!

गणरायाच्या आरतीचा मान समाजातील विविध घटकांना देत कृतज्ञता आणि सामाजिक समावेशकतेची आगळीवेगळी परंपरा जपणारे उन्नती सोशल फाऊंडेशन

गणेशोत्सव २०२६ | पिंपळे सौदागर

पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशनच्या ‘उन्नतीच्या गणपती’च्या गणेशोत्सवात यंदाही भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या पावन पर्वात पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांच्या शुभहस्ते उन्नतीच्या गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष प्रसंग ठरला.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गणरायाच्या आरतीचा मान समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि घटकांना दिला जातो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचा सन्मान करणारा उत्सव व्हावा, ही या उपक्रमामागील भावना आहे.

यापूर्वी उन्नतीच्या गणरायाच्या आरतीचा मान सफाई कामगार, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, तृतीयपंथी बांधव यांच्यासह समाजातील विविध घटकांना देण्यात आला आहे.

समाजाच्या दैनंदिन जीवनात आपल्या कार्यातून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा उन्नती सोशल फाऊंडेशन सातत्याने जपत आहे.

यावेळी बोलताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या,

“उन्नतीचा गणपती हा केवळ उन्नती सोशल फाऊंडेशनचा गणपती नसून पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या श्रद्धेचा आणि आपुलकीचा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान व्हावा, ही आमची भूमिका आहे.

दरवर्षी गणरायाच्या आरतीचा मान वेगवेगळ्या क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. काही दिवसांपूर्वी सफाई कामगारांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली होती. यंदा विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि दिशा देणाऱ्या महिला शिक्षकांच्या हस्ते आरती करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्हाला आनंद आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, परस्पर सन्मान आणि ‘सर्वांच्या सहभागातून समाजाची उन्नती’ हा संदेश देण्याचा उन्नती सोशल फाऊंडेशनचा सातत्याने प्रयत्न आहे.”

याचबरोबर उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गणेश महापूजा व महाप्रसाद तसेच पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांमधील ढोल-ताशा व लेझीम पथकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय वाद्यसंस्कृती, पारंपरिक कला आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड…
परंपरेला कृतज्ञतेची साथ…
आणि उत्सवाला सर्वसमावेशकतेची दिशा…

हीच ‘उन्नतीच्या गणपती’ची विशेष ओळख!

गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान आणि प्रत्येकाच्या योगदानाची दखल घेण्याची ही परंपरा निश्चितच गणेशोत्सवाच्या उत्सवभावनेला अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण बनवणारी आहे.

‘उन्नतीचा गणपती’ — भक्तीचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव!

यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक श्री. संजय भिसे यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सदस्य, उन्नती सखी मंचच्या सदस्या, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य, विठाई वाचनालयाचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य तसेच पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!