spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या मल्लखांब स्पर्धा संपन्न

३८ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत टिळक रोड वरील महाराष्ट्र मंडळ येथे आज मुलींच्या दोरीवरील मल्लखांब स्पर्धा पार पडल्या. चितळे बंधू मिठाईवाले उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, क्रीडा समिती प्रमुख प्रसन्न गोखले या प्रसंगी उपस्थित होते. या स्पर्धेत १६ वर्षांखालील वायोगटातील १५० हून अधिक मुली सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित योगेश मालवीय आणि महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना कार्यकारिणी सदस्य अॅड. संजय केकाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रमा गोखले यांनी पुरलेल्या खांबावरील मल्लखांबाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलांची मल्लखांब स्पर्धा रविवारी दि. २० सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर होणार आहे. पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आल्या. प्रारंभी महाराष्ट्र मंडळाचे रोहन दामले यांनी स्वागत केले आणि आभार अभिजित भोसले यांनी मानले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्र मंडळ येथे संपन्न होईल.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!