spot_img
spot_img
spot_img

उगवते तारे व इंद्रधनू कार्यक्रम १२०० बाल व युवा कलाकारांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध!!

३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या उगवते तारे व इंद्रधनू कार्यक्रमात पुणे व परीसरातील ६० शाळांमधील १२०० हून अधिक बाल व युवा कलाकारांनी सहभाग घेऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ७ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील उगवत्या बाल कलाकारांसाठी ‘उगवते तारे’ आणि १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवा कलाकारांसाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमाचे आयोजन पुणे फेस्टिव्हलमध्ये केले गेले. दरवर्षीपेक्षा यंदा अधिक मोठा प्रतिसाद लाभला. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमास बाल व युवा कलाकारांसमवेत पालक, शिक्षक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बाल व युवा कलाकारांनी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भारतनाट्यम ,कथक मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्य प्रकारांबरोबरच लावणी-फ्युजन, संबळवादन , गुजराथी नृत्य,राजस्थानी नृत्य, आसामी नृत्य, फोल्क-डान्स, घुमर, देवीचा गोंधळ, देशभक्तीची गाणी, पोवाडा, जोगवा, सिने नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, गणेश वंदना, म्हैशासुर मर्दिनी स्तोत्र, मंगळागौरीचे खेळ असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बाल व युवा कलाकारांनी सादर केले. या सर्वांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. यामध्ये अनेक समूह नृत्य वाहवा मिळवून गेली. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षक त्यांना प्रोत्साहन देत होते.

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे व विश्वस्त मोहन टिल्लू आदींनी आवर्जून येऊन बाल व युवा कलाकारांना शुभेच्छा दिल्या. सुप्रीया सेनगुप्ता यांनी सूत्रसंचालन केले. नीता राजपूत व अॅड.सचिन हिंगणेकर यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले. बालगंधर्व रंगमंदिराचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक श्रीकांत कांबळे होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!