पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक व पुतळ्यासमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या निरंतर राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाने पावन झालेल्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या भूमीत झालेल्या या दीपोत्सवातून ‘राष्ट्र प्रथम’, विकसित भारत आणि राष्ट्रप्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आला. प्रत्येक दीपज्योतीतून राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी महापौर अपर्णाताई डोके, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगर सेवक मोरेश्वर भोंडवे नगरसेविका मनीषा चिंचवडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे, नंदू काका भोगले, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, मंडलाध्यक्ष हर्षल नढे, संयोजक हेमंत डांगे, मनिष पंजाबी, अमेय देशपांडे, योगेश चिंचवडे, तुषार वराडे यांच्यासह प्रभाग क्रमांक १८ चिंचवडमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 223971