शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘बालभारती’ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम तयार करणारी शासनाची मुख्य संस्था आहे. याची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली असून यंदा ‘बालभारती’चे ६० वे वर्ष साजरे होत आहे. बालभारती तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी व गुजराती अशा ८ भाषांमध्ये दरवर्षी कोट्यावधी पुस्तके प्रकाशित व वितरीत होतात. ‘बालभारती’च्या या अद्वितीय योगदानाबद्दल पुणे फेस्टिव्हल तर्फे बालभारती संस्थेचा सत्कार गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘बालभारती’च्या संचालिका मा. अनुराधा ओक हा सत्कार स्वीकारतील. ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.




Total Users : 223226