spot_img
spot_img
spot_img

बापदेव नगरमध्ये नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू; नगरसेविका रेश्मा कातळे यांचा पुढाकार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बापदेव नगर, कॉलनी क्रमांक ४ येथील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे यांच्या पुढाकाराने नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार रेश्मा कातळे यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावले.

नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी परिसरातील नागरिक, महिला आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले.

“नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत, प्रश्न सोडवण्याचा लोकसेवेचा संकल्प कायम!” या भूमिकेतून परिसरातील विकासकामांना गती देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या कामामुळे बापदेव नगर परिसरातील नागरिकांना आगामी काळात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!