spot_img
spot_img
spot_img

सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थी गुणगौरवाचे २१ वे वर्ष

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सातत्य, सचोटी आणि सत्यता याचा अवलंब करा, व्यसनापासून दूर रहा असे मार्गदर्शन आमदार शंकर जगताप यांनी केले. तसेच पिंपळे निलख परिसरातील पाणी, कचरा, वाहतूक या नागरी समस्या सोडवून भावी नगरसेवक सचिन साठे यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे उत्तम क्रीडा संकुल लवकरच उभे करू अशी माहिती आ. जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली.

पिंपळे निलख येथे शनिवारी (दि. १५) सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, गुणवंत विद्यार्थी, विशेष सत्कारार्थी पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन व गौरव करण्याची २२ वर्षांची अखंड परंपरा जपणाऱ्या सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करताना सचिन साठे यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच सामाजिक, क्रीडा, आध्यात्मिक, आरोग्य व उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. एक चांगला सुसंस्कृत माणूस म्हणून घडवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

यावेळी इयत्ता १० वी, तेजस किशोर उपाध्याय याला स्व. सुरज काळुराम नांदगुडे स्मृती पुरस्कार, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता १२ वी, आकांशा अरुण यादव याला स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता १० वी, विराज उदय पाटील, राधेश्वरी अमोल कुरेकर, राही संतोष जाधव आणि अदिती महेश भोसले आणि इयत्ता १२ वी, प्रभव दिपक रुस्तागी, अनुष्का हेमंत गुंजाळ, श्रेया निकुंजकुमार बनकर व जान्हवी प्रदीप पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही पुरस्कार, स्मृतीचिन्ह स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच, सन्मानचिन्ह व स्कूल बॅग, इतर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व स्कूल बॅग देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिनकर सिताराम सावंत, शरद विनायक वाघ, गणेश बाळासाहेब देशमुख, सिकंदर प्यारेलाल तामचेकर, विश्वजित लखन कोंढे, क्षितिज उमेश साठे आणि सर्वज्ञ सुबोध जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार अमृता साठे यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!