शबनम न्यूज | प्रतिनिधी
थेरगाव शैक्षणिक संकुल येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, ‘ग’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा पवार, नगरसदस्य तानाजी बारणे व योगिता बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगावचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, प्राथमिक विभागाचे शिवाजी दौंडकर, राजेश भेलावे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. राष्ट्रगीत, ध्वजवंदना आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शैक्षणिक संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या त्यागाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे थेरगाव शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित झाला.





Total Users : 213876