शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील गंगानगर प्राधिकरण परिसरात आदर्श मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते चंद्रमणी जावळे मामा यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही भर घातली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.





Total Users : 213636