spot_img
spot_img
spot_img

लोकजनशक्ती पार्टीतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात; पूरग्रस्त कुटुंबांना धान्यवाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने चिंचवड येथील संपर्क कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष आयु. प्रसाद शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला. यावेळी परिसरातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. संकटकाळात गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील लोकजनशक्ती पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद शेलार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आयु. सुंदर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीपभाऊ कांबळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान महिला मंडळाच्या सौ. अनिताताई कांबळे, वृषालीताई कदम, सोनवणे ताई, वाघमारे ताई, साळवे ताई तसेच आकाश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासोबतच बालकांना खाऊवाटप, पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!