प्रतिनिधी युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुणवत्तापूर्ण, उत्कृष्ट आणि दीर्घकालीन सेवेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांना विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक, तर २९ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदके तसेच १५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
राष्ट्रपती पदकासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांची गुणवत्तापूर्ण व दीर्घकालीन सेवेसाठी निवड झाली आहे.
अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ आणि पोलीस हवालदार रामदास बारटक्के यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आव्हाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दीपक महाजन, राजेंद्र कोनकेरी, पोलीस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, कामिनी पवळे आणि मपोशि नुतन जव्हेरी यांचा गौरव करण्यात आला आहे.
दरम्यान, नक्षलग्रस्त भागात खडतर व विशेष सेवा बजावलेल्या अधिकारी-अंमलदारांना देण्यात येणाऱ्या विशेष सेवा पदकासाठी १५ जणांची निवड झाली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आटवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टार्फे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिवनेरी हॉलमध्ये पदक प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पदक विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग डॉ. बसवराज तेली, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.





Total Users : 213548