spot_img
spot_img
spot_img

क प्रभागात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; राष्ट्रध्वजाला मानवंदना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त क प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरसेवक तथा क प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताच्या सन्मानपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर MSF जवानांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जवानांच्या संचलनामुळे कार्यक्रमाला विशेष दिमाख प्राप्त झाला.

यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी क प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ध्वजारोहण समारंभाला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्राभिमानाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!