spot_img
spot_img
spot_img

यशस्वी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; प्रभात फेरीतून देशभक्तीचा जागर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विद्यमान नगरसेविका तथा ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विभागीय अध्यक्षा सौ. अर्चनाताई सस्ते आणि विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष देवकाते सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव मा. डॉ. तुषार देवकाते सर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा देवकाते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई आल्हाट, मंदाताई आल्हाट, श्री. सुरेश सूर्यवंशी, विश्वनाथ प्रताप, फुरकान मुजावर, किशोर कदम तसेच सद्गुरू पतसंस्थेचे हिरामण इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष देवकाते यांनी केले. त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आदर्शनगर, फातिमानगर आणि मोरया कॉलनी परिसरातून भव्य प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत प्रात्यक्षिके सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा देत स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत विद्यालयात स्वातंत्र्यदिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!