शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगावच्या वतीने थेरगाव परिसरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागामुळे परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीदरम्यान राष्ट्रपुरुष आणि स्वातंत्र्यवीरांच्या नावांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला.
या रॅलीस शुभेच्छा देण्यासाठी काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बहिरट उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका हर्षदा राऊत, सोनाली जाधव, मंगल आव्हाड, नेहा जाधव, बालाजी जगताप, संभाजी मोरे, मंगेश मुंढे, अकीब शेख, सारिका कोळी, सुरक्षा रक्षक संतोष बारणे, संतोष सुतार आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या तिरंगा रॅलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण झाली. रॅलीला परिसरातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





Total Users : 213375