spot_img
spot_img
spot_img

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधासंबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. याबाबत त्यांनी उद्योजकांना आश्वस्त केले आहे. यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!