spot_img
spot_img
spot_img

ताथवडेत रॉंग साइडने आलेल्या स्कूल व्हॅनची स्कूटरला धडक; दुचाकीस्वार जखमी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रॉंग साइडने भरधाव वेगात आलेल्या स्कूल व्हॅनने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ताथवडे येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ताथवडे येथील हॉटेल किया इनसमोर हा अपघात झाला. संदिप सुरेश बरसैया (वय ४६) हे त्यांच्या स्कूटरवरून भूमकर चौकाकडून डांगे चौकाच्या दिशेने जात होते.

त्यावेळी डांगे चौकाकडून समोरून येणारी एमएच १२ झेडई ६७२० क्रमांकाची स्कूल व्हॅन रॉंग साइडने भरधाव वेगात आली. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत बरसैया यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेत ते स्कूटरसह रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात संबंधित स्कूल व्हॅन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, २८५, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे व शिरसाठ करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!