spot_img
spot_img
spot_img

दापोडीत गांजा ओढताना तरुण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

दापोडी येथील एस.टी. वर्कशॉप रोडलगतच्या मोकळ्या फुटपाथवर गांजा ओढत असलेल्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक नितीन कांबळे (वय २३, रा. दापोडी) हा मोकळ्या फुटपाथवर गांजा सेवन करताना आढळून आला. त्याच्याकडे गांजा ओढण्यासाठीचे साहित्य आणि लायटर आढळून आले. तसेच दुधी रंगाच्या कागदामध्ये गुंडाळलेला गांजा तोंडात धरून त्यातून निघणारा धूर ओढत असल्याचे पोलिसांना आढळले.

याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!