spot_img
spot_img
spot_img

केळगावात २१५ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक; १० हजार ७५० रुपयांचा गांजा जप्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 

आळंदी-चिंबळी रोडलगत केळगाव हद्दीत पोलिसांनी कारवाई करून विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून २१५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १० हजार ७५० रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास आसाराम बापू मठाजवळील मोकळ्या पटांगणात ही कारवाई करण्यात आली. विनयदिप गंगाधर मानवते (वय २८, सध्या रा. आंबेडकरनगर, चिंबळी) हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे २१५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

विक्रीच्या उद्देशाने हा गांजा बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी व दुधमल करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!