spot_img
spot_img
spot_img

पतीच्या मृत्यूनंतर मानसिक छळाचा आरोप; मोशीतील महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्यानंतर मदतनिधीच्या पैशांच्या वाटपावरून वाद, तसेच लग्नातील मानपान, खर्च आणि दोन मुली झाल्याच्या कारणावरून वारंवार टोमणे देत मानसिक छळ केल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळपर्यंत मोशीतील संजय गांधीनगर परिसरात संबंधित महिलेचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. लग्नात मानपान केला नाही, खर्च केला नाही, तसेच तिला दोन मुलीच झाल्या, या कारणांवरून आरोपींकडून वारंवार टोमणे मारले जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, महिलेच्या पतीचा मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर मिळणाऱ्या मदतनिधीच्या पैशांच्या वाटपावरूनही वाद घालत शिवीगाळ करून तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दशवंत व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!