spot_img
spot_img
spot_img

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोशी येथे भव्य रक्तदान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रामकृष्ण बँक्वेट हॉल, भारतमाता चौक, मोशी येथे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराला मोशी परिसरातील ग्रामस्थ, सोसायटीधारक, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, माता-भगिनी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रक्त तपासणी आणि रक्तदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

शिबिरामध्ये सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली. त्यापैकी मित्रपरिवार, कार्यकर्ते, सोसायटीधारक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक अशा एकूण १७३ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदात्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून योग्य मार्गदर्शनानंतर रक्त संकलन करण्यात आले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजामध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. रक्तपेढीचे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक, मित्रपरिवार, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती.

या प्रसंगी माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले की, “समाजातील गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि युवकांमध्ये रक्तदानाची भावना वाढावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!