spot_img
spot_img
spot_img

पुनावळे येथील ऐतिहासिक “खंडोबा मंदिर सभामंडपाचे “भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुनावळे येथील सुमारे २०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री खंडोबा मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन आज रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्री खंडोबा मंदिरासाठी सुमारे ₹३० लाखांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून मंदिरासमोर भव्य व सुसज्ज सभामंडप उभारण्यात येणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यास पुणवळे गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुनावळे येथील श्री खंडोबा मंदिर हे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे प्राचीन मंदिर असून, सन २०२० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. काळ्या पाषाणातील चिरेबंदी बांधकाम, आकर्षक वास्तुशिल्प आणि मंदिरातील भगवान महादेवांचे शिवलिंग तसेच श्री खंडेरायांची मूर्ती यामुळे या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणवळेसह पंचक्रोशीतील हजारो भाविक नियमितपणे येथे दर्शनासाठी येत असतात.

या प्रसंगी प्रभाग क्रमांक २५ च्या नगरसेविका श्रुतीताई वाकडकर, नगरसेविका रेश्माताई भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, युवा कार्यकर्ते चेतन भुजबळ, रामभाऊ वाकडकर, सुनीलशेठ ढवळे यांच्यासह ज्ञानदेव काटे, बाळासाहेब बोर्डके, तुषार बोडके, अमर ढवळे, तानाजी शिंदे, निवृत्ती भुजबळ, प्रणीत ढवळे, अनिल बांदल, जालिंदर काटे, सुरेश रानवडे, सुरेश दर्शने आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंदिरासमोर भाविकांसाठी प्रशस्त सभामंडप उभारण्याची संकल्पना युवानेते नवनाथ ढवळे यांनी श्री खंडोबा देवस्थान समितीसमोर मांडली होती. त्यानंतर देवस्थान समितीचे विश्वस्त बाळासाहेब बोर्डके, तानाजी शिंदे, दत्तात्रय ढवळे पाटील व रोहिदास बोरगे यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्याकडे निधीची मागणी केली. आमदार जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधी मंजूर करून दिला. त्यानुसार आज या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी या सभामंडपामुळे मंदिर परिसर अधिक सुशोभित होण्यासह भाविकांना धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण भूमिपूजन सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी हरिषचंद्र भूजबळ, तुषार बोडके, तुषार ढवळे, अणिल बांदल, संभाजी शिंदे, ज्ञानदेव काटे, प्रधान काटे, बाजिराव बहिरट, बाबा गवारी, सचिन बोडके आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!