spot_img
spot_img
spot_img

‘छत्रपती संभाजी महाराज गुणगौरव पुरस्कार २०२६’ ने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

आमदार अमित गोरखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शाहूनगर येथील आमदार अमित गोरखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज गुणगौरव पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित गोरखे उपस्थित होते. त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत, समाजासाठी केलेले त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवावीत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आयोजक सुनील साठे यांनी केले. सुनीता लोखंडे यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका सादर केली, तर लतींद्र भिंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी काळूराम लांडगे, जागृती धर्माधिकारी, सुधा ढवळे, आरोही बनसोडे, प्रीती माने, निरंजन गाडे, महिंद्रा कडवा, जुन्या थॉमस, सुदेश गायकवाड, विश्वास गजरमल, पंडित बाबर, छाया बाबर, नंदा अहिरे, उज्वला गोरखेडे, हेमराज थापा, साहेबराव जाधव, मनोज साळवे, प्रज्ञा पोवार, ऐश्वर्या साठे, सचिन शिंदे, अभिनव सोनवणे आणि रोहित अडागळे यांना ‘छत्रपती संभाजी महाराज गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!