spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी ‘समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने खाते; ३५ नागरिकांची फसवणूक, गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी ‘समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या नावाने बँक खाते उघडून त्याचा वापर केल्याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुशांत रविंद्र सोये (वय २९, रा. खराबवाडी, ता. खेड) याने साथीदारांच्या संगनमताने बँक ऑफ महाराष्ट्र, महाळुंगे शाखेत ‘समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने खाते उघडले. तपासात या खात्याद्वारे देशातील ३५ नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित ₹१,३१,८८१ रकमेचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!