spot_img
spot_img
spot_img

फ्लिपकार्टच्या मालवाहू वाहनातून २४ मोबाईल व कॅमेरा लंपास; चालकाविरुद्ध ₹7.71 लाखांच्या अपहाराचा गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

फ्लिपकार्ट कंपनीच्या मालवाहू वाहनातील २४ मोबाईल फोन आणि एक कॅमेरा, असा एकूण ₹७.७१ लाखांचा ऐवज अपहार केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी सुरेश गायकवाड (रा. कुरुळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी चेतन तुकाराम सावंत (रा. तळेगाव दाभाडे) हा फिर्यादीच्या फ्लिपकार्ट कंपनीसाठी धावणाऱ्या महिंद्रा लोडिंग वाहनाचा चालक होता.

तपासात, कंपनीने वाहनाला केवळ दोन ठिकाणी थांबविण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही आरोपीने तळेगावजवळील डी.पी. रोड, यशवंत नगर परिसरात वाहन वारंवार थांबवून ३ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या कंपनीचे २४ मोबाईल फोन व एक कॅमेरा, असा ₹७,७१,४०१ किमतीचा माल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!