spot_img
spot_img
spot_img

अजमेरा येथे इमारतीसमोरून दुचाकी चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

अजमेरा येथील वास्तू उद्योग सोसायटीसमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकील निजामुद्दीन अन्सारी (वय ३१, रा. वास्तू उद्योग सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २४ जुलै रोजी रात्री १० ते २५ जुलै रोजी सकाळी १० या कालावधीत जर्मन बेकरीसमोर पार्क केलेली हिरो होंडा सीडी डिलक्स (एमएच १४ एआर ०५७१) ही सुमारे ₹१० हजार किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!