spot_img
spot_img
spot_img

भोसरीत अवैध देशी दारू व प्रतिबंधित गुटखा विक्रीवर कारवाई; एकास अटक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी परिसरात अवैधरीत्या देशी दारूची विक्री तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ठेवल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय गणेश पान शॉप, विश्व विलास बिर्याणी हाऊसजवळ भोसरी येथे शुक्रवारी (२५ जुलै) सायंकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत विश्वभरनाथ फौजदार यादव (वय ४५, रा. भोसरी) याला ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सुमारे ₹१८,७९६ किमतीचा देशी दारूचा साठा तसेच शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून हा प्रतिबंधित माल बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २२३, २७१, २७२, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!