spot_img
spot_img
spot_img

मारुंजीत किरकोळ वादातून तरुणावर लाकडी काठीने हल्ला; दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मारुंजी येथील रॅम्बो पीजी परिसरात फोनवर बोलत असलेल्या तरुणावर किरकोळ कारणावरून लाकडी काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (२५ जुलै) पहाटे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन सचिन गायकवाड (वय २१) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोशन हे मित्राशी फोनवर बोलत उभे असताना आकाश सतीश सुरवसे (रा. थेरगाव) आणि विष्णुकांत दयानंद अंधारे (रा. मारुंजी) यांनी विनाकारण शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारताच आकाश सुरवसे याने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच विष्णुकांत अंधारे याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८ (२), ११५ (२), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!