शबनम न्यूज | प्रतिनिधी
अथर्व सुदामे यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित झालेली “पूर्णब्रह्म” ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असून, अल्पावधीतच तिला भरभरून प्रतिसाद आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते सुबोध भावे आणि दिग्दर्शक अथर्व सुदामे यांची शॉर्ट फिल्म ‘पूर्णब्रह्म’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संतश्रेष्ठ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर आधारित ही कलाकृती आधुनिक पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचा प्रभावी वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न करते.
या चित्रपटात सुबोध भावे यांनी गोंदवलेकर महाराजांची भूमिका साकारली असून, दिग्दर्शक अथर्व सुदामे यांनी विषयाची आध्यात्मिक गूढता आणि भावनिक गहिरेपणा संवेदनशीलपणे पडद्यावर साकारला आहे. उत्कृष्ट अभिनय आणि प्रभावी कथनशैली यामुळे ‘पूर्णब्रह्म’ ही केवळ शॉर्ट फिल्म नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे.




Total Users : 225197