spot_img
spot_img
spot_img

नारी शक्ती महोत्सवाचे चिंचवडमध्ये आयोजन; तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य व समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने तसेच विधानपरिषद सदस्या आ. उमाताई खापरे यांच्या पुढाकारातून ‘नारी शक्ती महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव २७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रंगणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी भव्य भजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी प्रसिद्ध कलाकार डॉ. सौ. सुषमा गाडेकर यांचा ‘नृत्य गाथा (भक्ती, शक्ती, संस्कृती)’ हा विशेष नृत्याविष्कार सादर होणार आहे.

मंगळवार, २८ जुलै रोजी भव्य मंगळागौरीचे सांस्कृतिक सादरीकरण होणार असून त्यानंतर सुवर्णा वाघ यांच्या शिष्यांचा नृत्यांजली कार्यक्रम रंगणार आहे. याच दिवशी सायंकाळी मा. सानिया पाटणकर यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी बुधवार, २९ जुलै रोजी सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम होणार असून रसिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

याशिवाय सावनी रविंद्र, सानिया पाटणकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वतंत्र सांगीतिक मैफिलींचे आयोजन करण्यात आले असून विविध कलाविष्कारांद्वारे महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि परंपरेचा गौरव केला जाणार आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी ९३०७२२७०२३ आणि ८३२९०६६६३७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संयोजनाची जबाबदारी विधानपरिषद सदस्या सौ. उमाताई गिरीश खापरे यांनी स्वीकारली असून महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!