शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान, आधार व डाक महामेळावा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील मेढे जिल्हा परिषद शाळा (जाधववाडी) येथे ५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन उद्योजक प्रशांत डोके यांनी केले होते. थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी काढण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चापेकर स्मारक समिती गुरुकुलम येथे विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी नगरसेवक निलेश बारणे, गटनेते विश्वजीत बारणे, युवासेना पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम झेंडे यांनी केले.
क्रांतिवीर चापेकर विद्यालय, चिंचवड येथे विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. याच ठिकाणी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे आयोजन देवेंद्र पारेख यांनी केले.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ९० दिवसांच्या मोफत आरोग्य तपासणी अभियानाचा आतापर्यंत सुमारे दोन हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. तसेच आधार व डाक महामेळाव्याद्वारे सुमारे ८०० नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला. यामध्ये आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरण, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे विश्वजीत बारणे यांच्या वाढदिवसाला समाजोपयोगी स्वरूप प्राप्त झाले असून नागरिकांनी या उपक्रमांचे स्वागत केले.


