spot_img
spot_img
spot_img

दिव्यांग सेल मावळ यांच्या वतीने आश्रम शाळेतील मुलांना फळे वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिनांक 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके.. जिल्हाध्यक्ष विठ्ठल आण्णा शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, महिला अध्यक्षा सुवर्णा ताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्षा सौ ज्योतीताई भरत राजिवडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवस्ती नाने मावळ करुणांजली मतिमंद मुलींची शाळा तळेगाव दाभाडे व संजीवनी मुलींचे वस्तीगृह यशवंत नगर या तीन शाळेतील मुलांना फळे व खाऊचे पाठव करण्यात आले .

कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्षा ज्योतीताई भरत राजिवडे, छायाताई साळुंखे ,रेखाताई बरेदे , राजश्री नाईकरे अश्विनी बेंद्रे ,जयश्री म्हसे ,सुरैया शेख सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजिवडे ,रविंद्र नाईकरे…सौ.कल्यानी, घोडे अशावरी बुधकर,दिलीप काळोखे, सुनील कचरे , मारुती कदम , किशोर खोडे , प्रदीप भुजबळ.. सिस्टर ओलिव्हिया फर्नांडिस ..सिस्टर लॅव्हिना क्रास्ता .. श्री अल्बर्ट डेविड.. सुरेखा कुंभार ..वैष्णवी कोरफळकर …सुषमा कवळे प्रणिता लौडे ..वर्षा शिरसाट सुकेशनी भोसले..हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

दिव्यांग सेल अध्यक्षा ज्योतीताई राजीवडे यांनी आपल्या मनोगत अजित दादा पवार यांच्या बद्दलचे राजकारणातील तसेच समाज कार्याची वेगवेगळे अनुभव शाळेतील मुलांना व शिक्षकांना सांगून दादांच्या कार्याची आठवण करून दिली . शेवटी सर्व मुलांना फळे व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!