spot_img
spot_img
spot_img

अजितदादांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात निगडीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताहा’ अंतर्गत निगडी प्राधिकरण येथील दादा-दादी पार्कमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नीलेश शिंदे मित्र परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी देशी लिंब, वड आणि पारिजातक या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची आठवण उपस्थितांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे शहराचा झालेला कायापालट स्मरणात ठेवत वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमास प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, माजी नगरसेविका भारतीताई फरांदे, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, राजेंद्र कदम, संजय थोरात, रणजित आवटे, नेहाताई काळे, मिराताई कुदळे, निखिल पांढरकर, सुहास पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि मैत्री ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे नियोजन आणि आयोजन सचिन बनसोडे, प्रशांत साबळे, परेश लोके, कुणाल कांबळे, मिलिंद मोहिते आणि अमर हंचाटे यांनी केले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!