पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याच्या उद्देशाने तिचे वय वाढवून बनावट आधारकार्ड तयार केल्याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी एका कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण (ता. खेड) येथील पंडीत माणिक किंगरे (वय 42) याने 17 वर्षीय मुलीची खरी जन्मतारीख 28 जानेवारी 2009 असताना ती 28 जानेवारी 2008 असल्याचे दर्शविणारे बनावट आधारकार्ड तयार केले. संबंधित मुलीचे लग्न लावण्यासाठी हा बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोले करीत आहेत.




Total Users : 226823