spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसीतील कंपनीत सुरक्षेचा बळी; छतावरून पडून कामगाराचा मृत्यू, मालकावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने 26 वर्षीय कामगाराचा छतावरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी दुपारी शुभम उद्योग, जे-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथे मोहम्मद सय्यद शोहराब (वय 26) हे पत्रे बदलण्याचे काम करत असताना छतावरून खाली लोखंडी पाईपवर पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेप्रकरणी कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचे संचालक समीर विजयकुमार भट (रा. धनकवडी, पुणे) यांच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खोसे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!