पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध दापोडी पोलिसांनी शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दापोडी स्मशानभूमीजवळ पोलिसांनी कारवाई करत सागर मोहन जावळे (वय 32, रा. काळेवाडी, पुणे) याच्या ताब्यातून विनापरवाना धारदार लोखंडी कोयता जप्त केला. शहरात लागू असलेल्या मनाई आदेशाच्या कालावधीत आरोपीने घातक शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलिस करत आहेत.


