पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत 486 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 23 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.40 वाजता एबीसी पेट्रोल पंपाकडून व्हिलेज हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील इलेक्ट्रिक टॉवरसमोर कारवाई करण्यात आली. यावेळी धिरज देवीदास कदम (वय 26, रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) याच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेला 486 ग्रॅम गांजा आढळून आला.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.


