पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
मृत वडिलांच्या नावाने खोटे व बनावट इच्छापत्र (वसीयत) तयार करून ते न्यायालयात सादर केल्याप्रकरणी आई आणि मुलाविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित विष्णू चाळके (रा. चिंचवड पूर्व) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दिवंगत वडील विष्णू भाऊराव चाळके यांच्या नावाचे बनावट इच्छापत्र आरोपी विजया विष्णू चाळके (वय 82) आणि अविनाश विष्णू चाळके (वय 60) यांनी संगनमत करून पिंपरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. हा प्रकार 26 सप्टेंबर 2020 ते 7 मे 2026 या कालावधीत घडल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी 24 जून 2026 रोजी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आटवे करीत आहेत.


