शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने पक्षाच्या विविध आघाड्या, विभाग व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गाताई भोर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. पक्षाचे टप्प्याटप्प्याने विस्तारीकरण करण्यात येणार असून आगामी काळात विविध आघाड्या, विभाग, प्रभाग, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी
श्री शिवाजीराव पाटील प्रवक्ते पश्चिम महाराष्ट्र. जयंश्री साळुंखे – संपर्क प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र
प्रशांत पठारे – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
विशाल पठारे – सहसचिव, महाराष्ट्र राज्य
हर्षवर्धन लोखंडे – सचिव, महाराष्ट्र राज्य
पुणे जिल्हा कार्यकारिणी
रईसा पठाण – जिल्हा संपर्क प्रमुख
उत्तमराव मांढरे – जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
हेमंत दास – जिल्हाध्यक्ष, वाहतूक आघाडी
अशोक बेलापुरकर – जिल्हा क्रीडा विभाग संघटक
शुभम गायकवाड – जिल्हा युवा आघाडी संपर्क प्रमुख
मोहसीना शेख – जिल्हा सचिव
स्नेहा पठारे – जिल्हाध्यक्षा, शिक्षण आघाडी
पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी
वैभव जगताप – अध्यक्ष, उद्योग आघाडी
रेशमा मुल्ला – महिला अध्यक्षा, उद्योग आघाडी
आकाश बनसोडे – युवा अध्यक्ष
अवंतिका भोर – युवती अध्यक्षा
रमा बनसोडे – शहर उपाध्यक्षा
मेघा कुलकर्णी – भोसरी विभाग उपाध्यक्षा
संतोष डांगी .पिंपळे गुरव प्रभाग अध्यक्षा
इंद्रायणी गायकवाड – उपाध्यक्षा, प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर
कु. दिपाली चव्हाण – पुणे शहर युवती आघाडी उपाध्यक्षा
निरंजन मनवर – उपाध्यक्ष, कामगार आघाडी
खदीर पठाण – उपाध्यक्ष, कामगार आघाडी
रफीक शेख – उपाध्यक्ष, वाहतूक (ट्रान्सपोर्ट) आघाडी
हुरबानू पठाण – पिंपरी चिंचवड अध्यक्षा, अल्पसंख्याक विभाग
रूपाली शिरवळे (निकम) – उपाध्यक्षा, क्रीडा विभाग
अमोल चव्हाण – संपर्क प्रमुख, कामगार आघाडी
इतर नि
निवेदिता सावंत – खेड तालुका संघटक
यावेळी मार्गदर्शक श्री अभय दादा भोर, राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गाताई भोर, उद्योग आघाडी अध्यक्ष वैभव जगताप तसेच शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गाताई भोर यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने केवळ पद धारण न करता एक समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करावे, समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा व पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करावी, असे आवाहन केले.
पुढील काळात उद्योग आघाडी, कामगार आघाडी, वाहतूक आघाडी, आरोग्य विभाग, शैक्षणिक आघाडी, क्रीडा आघाडी, महिला सुरक्षा आघाडी, कला-संस्कृती आघाडी आदी विविध विभागांच्या समित्या स्थापन करण्यात येणार असून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक परिसरात शाखा निर्मिती अभियान राबविण्यात येणार आहे. समित्यांमध्ये बहुजन समाजाला प्राधान्य देण्यात येणार असून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नवीन कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
पक्षात अनेक अनुभवी, संघर्षशील व विविध आंदोलने आणि जनचळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेले कार्यकर्ते कार्यरत असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे कार्य केले जाईल. विशेषतः लहान मुली, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षा, संरक्षण व सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सदर पदाधिकारी नियुक्ती समारंभास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक-युवती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


