पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
हिंजवडी फेज-३ येथील मेगापॉलीस सोसायटीमध्ये कारच्या नुकसानभरपाईच्या कारणावरून दोन महिलांमध्ये वाद होऊन एका महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्प्रिंग्स मेगापॉलीस सोसायटीतील रहिवासी मनिषा खटके या त्यांच्या फ्लॅटसमोर उभ्या असताना आरोपी महिलेने “माझ्या कारच्या नुकसानीची भरपाई दे” अशी मागणी करत वाद घातला. यानंतर आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीच्या नाकावर आणि कानावर हाताने मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या हातातील बांगडी कान व नाकाला लागल्याने त्यांना दुखापत झाली. घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


