spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा महिला मोर्चाच्या पुढाकारातून १४ मंडळांमध्ये व्यापक जनजागृती; नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 वाढते प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा झपाट्याने होणारा ऱ्हास आणि इंधनाच्या वाढत्या किमती या पार्श्वभूमीवर इंधन व खाद्यतेल बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या ‘इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशाच्या शाश्वत विकासासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांची बचत ही काळाची गरज असल्याचा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला. नागरिकांमध्ये इंधन बचतीबाबत जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.

हा महत्त्वपूर्ण उपक्रम भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटन मंत्री मधुकर बच्चे यांच्या विशेष सहकार्याने या अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमास चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शहरातील विविध भागांमध्ये आणि तब्बल १४ मंडळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत इंधन बचतीचे महत्त्व पटवून दिले. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर, अनावश्यक वाहन वापर टाळणे, वाहनांची नियमित देखभाल करणे, कारपूलचा अवलंब करणे यासारख्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याचबरोबर, आहारामध्ये खाद्यतेलाचा मर्यादित आणि योग्य वापर केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, तसेच तेलाचा अपव्यय टाळता येतो, याबाबतही महिलांना आणि कुटुंबीयांना सविस्तर माहिती देण्यात आली. निरोगी आहार पद्धती, संतुलित जीवनशैली आणि संसाधनांचा जबाबदारीने वापर या विषयांवरही जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेच्या यशस्वी नियोजनामध्ये महिला मोर्चाच्या सरचिटणीस अनघा रुद्र, उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर, चिटणीस स्वाती देशमुख, उपाध्यक्ष संजना मराठे आणि जयश्री मकवाना यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मंडळ अध्यक्षा नीता कुशारे, स्वाती जाधव, जोशना कलाटे, किरण पाचपांडे, वैशाली वाकचौरे, मनीषा कुलकर्णी, मीनाक्षी गायकवाड, वसुधा देशपांडे, सुप्रिया वझे, स्वाती पवार आणि नीता भालेराव यांनी विविध वस्त्यांमध्ये जनसंपर्क साधत अभियानाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला.

याशिवाय शहरातील सर्व मंडळाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेचे शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासह निरोगी समाज निर्मितीस हातभार लागणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!